Swapnil Kunte
Thursday, 4 December 2014
ओळखलत का सर मला दुष्काळात आला कोणी
कपडे होते विस्कटलेले घामाचे ते पाणी
क्षणभर बसला नंतर हसला !!
बोलला खालतीच पाहून ….
गंगामाई आलीच नाही
घरट कोरडच गेल राहून
चार भिंतीत पोर माझी ओक्साबोक्शी रडली
पाणी पाणी करत शेवटी म्हातारी माझी पडली
कारभारणीला घेऊन संगे आता रोज मरतो आहे
पडीक जमीन पाहतो आहे शेत रोज जाळतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पाणी द्या ना सर जरा कोरडेपणा वाढला"
मोडून पडलाय संसार आणि मोडलाय आता कणा
मस्तक आणि उर बडवून फक्त 'रड ' म्हणा ……
Friday, 21 November 2014
चालत होतो वाटे वरुनी
अवचित आले कोणी दुरुनी
चित्त हरपले तया पाहुनी …
कोण असे ते येउन गेले
मन माझे जे मोहून गेले
मन माझे मग म्हणते मजला
का रे ऐसा जासी गुंतुनी
आठवणींची पाने सळसळ
चित्ती होतसे नाजूक खळबळ
मनी दाटती विचार अवखळ
एकच दाटे विचार फिरुनी
कोणीच नसता अवती भवति
विचार असती सखे सोबती
कधी हत्तींचे बळ जे देती
नैराश्याला दूर सारुनी
मनोमनीचे विचार जुळता
अन कधी कधी घुसमट होता
बघा पुसुनी जाता जाता
का रे ऐसा बससी रुसुनी
वाट संपली चालत जाता
शेवट आला बघता बघता
अखेरचे ते दिसणे आता
मनास जाई चटका लावुनी
चालत होतो वाटेवरुनी
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)