Thursday, 4 December 2014

ओळखलत का सर मला दुष्काळात आला कोणी 
कपडे होते विस्कटलेले घामाचे ते पाणी
क्षणभर बसला नंतर हसला !!
बोलला खालतीच पाहून ….
गंगामाई आलीच नाही
घरट कोरडच गेल राहून
चार भिंतीत पोर माझी ओक्साबोक्शी रडली 
पाणी पाणी करत शेवटी म्हातारी माझी पडली
कारभारणीला घेऊन संगे आता रोज मरतो आहे 
पडीक जमीन पाहतो आहे  शेत रोज जाळतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला 
"पाणी द्या ना सर जरा कोरडेपणा वाढला"
मोडून पडलाय संसार आणि मोडलाय आता कणा 
मस्तक आणि उर बडवून फक्त 'रड ' म्हणा …… 

Friday, 21 November 2014


चालत होतो वाटे वरुनी
अवचित आले कोणी दुरुनी 
चित्त हरपले तया पाहुनी … 

कोण असे ते येउन गेले 
मन माझे जे मोहून गेले 
मन माझे मग म्हणते मजला 
का रे ऐसा जासी गुंतुनी 

आठवणींची पाने सळसळ 
चित्ती होतसे नाजूक खळबळ 
मनी दाटती विचार अवखळ 
एकच दाटे विचार फिरुनी 

कोणीच नसता अवती भवति 
विचार असती सखे सोबती 
कधी हत्तींचे बळ जे देती 
नैराश्याला दूर सारुनी 

मनोमनीचे विचार जुळता 
अन कधी कधी घुसमट होता 
बघा पुसुनी जाता जाता 
का रे ऐसा बससी रुसुनी 

वाट संपली चालत जाता 
शेवट आला बघता बघता 
अखेरचे ते दिसणे आता 
मनास जाई चटका लावुनी  

चालत होतो वाटेवरुनी 

Tuesday, 11 September 2012


कितीही जरी असलो आम्ही लोचट ...
भावना आमच्या नाहीयेत बऱ बोथट 

शेतकरी मेला तर त्याचे काय एवढे
आम्ही खाऊ मस्त बर्फी अन पेढे 

आले आले वाढदिवस लावू मस्त मोठे फ्लेक्स 
जाऊ कुठेतरी,मस्त पार्टी करू रीलेक्स 

कुपोषित मेली मुले तर त्याचे काय एवढे 
 आम्ही खाऊ मस्त बर्फी अन पेढे 

परवा कुणी चित्रकाराने आम्हाला नागवे केले 
पेटून उठले ना भौ आमचे सारे चेले 

खरे देशद्रोही आम्हाला पोसायचे असतात 
खरे बोलणारे मात्र अवती भवती नको असतात 

कलाकारालाच चक्क राजद्रोही ठरवले 
भ्रष्टाचारीच सगळे देशभक्त बनले 

आदर्श कोळशाने आमचे थोबाड काळे झाले 
झाले  तर झाले त्यात काय एवढे 
आम्ही खातच राहू मस्त बर्फी आणि पेढे 

Tuesday, 21 August 2012

साधारण २  महिन्यापूर्वी ------- "आग.......... आग........" ,' अरे काय झालं??'  "काही नाही रे जरा तालीम चालू आहे आपत्ती आलीच आज उद्या तर आपण रेडी पाहिजे ना पळायला"...... बरोबर रे बाबा !!!!! कधी काय होईल या राज्यात काही नेम नाही रे ....... आतापर्यंत  पाहतोयस ना  २६/७ ला पाण्याने बुडवलं ............ २६/११ ला अतिरेक्यांनी उडवलं .......... आणि मध्ये मध्ये काही किरकोळ गोष्टी चालूच असतात ..... म्हणजे ह्यांना अतिरेक्यांना पोसता येत पण राज्यातला दुष्काळ घालवता येत नाही ...... एक अतिरेकी मारला गेला म्हणे तुरुंगात तर पोलीस  अधिकारी  निलंबित होतो ..... पण जनतेला चांगलं वाटावं म्हणून अतिरेक्यांना फाशी देता येत नाही ............   

  २ महिन्यानंतर --------     " आग आग " अर्रे बाप रे खरंच आग लागली की राव आज मंत्रालयाला .... बर झालं साहेबांनी आधीच सराव करूब घेतला होता म्हणून नाहीतर आज काही खंर नव्हत ..... साहेबांना मानायला हव काय "दूरदृष्टी" आहे!!!! खरंच असे साहेब आहेत म्हणूनच राज्य चाललंय आज नाहीतर काय माहित काय झालं असत ....... आता मस्त पैकी सुट्टी एन्जॉय करूया बरेच दिवस मनात होत एखादी परदेशवारी करून यावी आयती संधीच मिळाली आता ...... मंत्रालय दुरुस्तीचं टेंडर काढू मस्त आणि मारून येऊ एक ट्रीप ......

अजून किती दिवस असे नालायक राज्यकर्ते आपण निवडून देणार आहोत ..... जो मुख्यमंत्री स्वतःच ऑफिस नाही वाचवू शकलेला तो राज्याची जबाबदारी काय सांभाळणार ???? पण आपण चार दिवस हा विषय चावणार अगदी चवीने आणि नंतर विसरून जाणार ...... परत हेच लोक आपलं रक्त पिणार अर्रे प्लीज हे आता तरी थांबवा ..........
महागाईचा पूर आहे , पाउस अजून दूर आहे 
दुष्काळाच्या राज्यामध्ये स्फोटांचा सूर आहे
आपलं सोडून कित्येकांचं आयुष्य का सजेत चाललंय???
सारं कसं मजेत चाललंय ......

भ्रष्टाचाराचा फास आहे, त्याला घोटाळ्याचा वास आहे 
राजकारण्यांच्या डोक्याला उगीच अण्णांचा त्रास आहे 
आपलं सोडून कित्येकांचं आयुष्य का सजेत चाललंय???
सारं कसं मजेत चाललंय ......

लवासा इज व्हेरी कूल,आदर्शची पडली भूल
नवे काहीतरी करणार म्हणजे घोटाळ्याची ती चाहूल
कुठेतरी काहीतरी गणित हे चुकत चाललंय
सारं कसं मजेत चाललंय ......

दुष्काळाच्या राज्यामध्ये आज कुणी हसत नाही,
"आमच्याकडे पाणी आहे आमच काही बिनसत नाही"

महाराजांच्या राज्यात शेतकऱ्याच्या गळ्याला फास आहे
तरुणाईची मात्र चंगळवादाकडे आस आहे
कोडगेपणाच्या दलदलीत सारं कसं फसत चाललंय
आणि तरीही सारं कसं मजेत चाललंय ........

पेट्रोलच्या भावाचा सतत वर खाली पारा
दरवाढीचा सुटलाय सोसाट्याचा वारा
सामान्य माणसाच्या छातीत धस्स होत चाललंय
आणि जगणं मात्र कॉल प्रमाणे मिस होत चाललंय

आणि तरीही सारं कसं मजेत चाललंय ............Swapnil Kunte....


Friday, 12 August 2011

बर्दाश्तगी की  हदों ने हमें हम से चुरा लिया
दूर रहकर जलाने वालों ने किया तो क्या बुरा किया

हम तो मुहब्बत में इस कदर लुट गए
जान ए वफ़ा की यादों ने अक्सर रुला दिया

हम तो कहते रहे ज़ालिम इस दिल से
की यादें उनकी भुलाया कर ....
कम्बख्त इस दिल ने हमारे यह ख़याल ही भुला दिया

पहले कभी हुआ करते थे हम आशिक ए इजहार
तेरी हसीं बेवफाई ने हमें शायर बना दिया

माना के हम ही करते रहे इकरार ए मोहब्बत
क्या तूने कभी यादों में भी मोहब्बत का ज़िक्र किया .......

Thursday, 7 July 2011

एखाद्याच क्षणाचे आयुष्य तरीही
कधी जाय सम्पोनी कळे न कुणाही
"मी" इथेही तिथेही सगळीकडेही
'जीवा' का रे ऐसे बोलीसी काही बाही //१//

साथ ना मिळे कुणाची जरीही
अखंड वाट चालतो एकता तरीही
फिरोनी सापडे ना जो कधीही कुठेही
जगी सर्व शोधती तरी 'मी'च तोही //२//

'स्वप्नील' डोळ्यांत जशी 'संपदा'ही
दृष्टिहीन वसती तरी या जगीही
कुणाची कशाची काय द्यावी हमीही
तरी सर्व देती यशाचीच द्वाही //३//