Friday, 12 August 2011

बर्दाश्तगी की  हदों ने हमें हम से चुरा लिया
दूर रहकर जलाने वालों ने किया तो क्या बुरा किया

हम तो मुहब्बत में इस कदर लुट गए
जान ए वफ़ा की यादों ने अक्सर रुला दिया

हम तो कहते रहे ज़ालिम इस दिल से
की यादें उनकी भुलाया कर ....
कम्बख्त इस दिल ने हमारे यह ख़याल ही भुला दिया

पहले कभी हुआ करते थे हम आशिक ए इजहार
तेरी हसीं बेवफाई ने हमें शायर बना दिया

माना के हम ही करते रहे इकरार ए मोहब्बत
क्या तूने कभी यादों में भी मोहब्बत का ज़िक्र किया .......

Thursday, 7 July 2011

एखाद्याच क्षणाचे आयुष्य तरीही
कधी जाय सम्पोनी कळे न कुणाही
"मी" इथेही तिथेही सगळीकडेही
'जीवा' का रे ऐसे बोलीसी काही बाही //१//

साथ ना मिळे कुणाची जरीही
अखंड वाट चालतो एकता तरीही
फिरोनी सापडे ना जो कधीही कुठेही
जगी सर्व शोधती तरी 'मी'च तोही //२//

'स्वप्नील' डोळ्यांत जशी 'संपदा'ही
दृष्टिहीन वसती तरी या जगीही
कुणाची कशाची काय द्यावी हमीही
तरी सर्व देती यशाचीच द्वाही //३//

Friday, 17 June 2011

मरे एक कोणी दुजा डोळा पाणी
पुढे बोलती सर्वही शोक वाणी
जन्मास येई मृत्यूस जाई
जे मध्ये भोगणे ते जगणे वगैरे

Saturday, 14 May 2011

माजोरडेपणा आणि आपल काय नात आहे ??

जसा साप आपली कात टाकतो आणि म्हैस जशी पाण्यात डुंबत बसते

तसेच आपण सभ्यपणाची कात टाकून

माजोरडेपणाच्या सरोवरात स्वतःला आकंठ बुडवून घेतलेले आहे

Friday, 13 May 2011

एक प्रियकर "तिची" वाट पाहत असतांना त्याच्या डोक्यात चाललेले 'काही' विचार :

आयुष्याच्या एका वळणावर ती मला भेटली
भेटली तर भेटली त्यात काय????? असं वाटलं थोडा वेळ ..
पण हळू हळू कळलं आयला मला चक्क पोरगी पटली!!!!!!!!
पटली तर पटली असं वाटलं..... असं नाही म्हणणार
कारण प्रेमात पडलोय म्हटल्यावर कुठेतरी, काहीतरी लागणार ,,,,
आता ह्या धडपडीत झालेल्या जखमा कितीही म्हटलं तरी
थोडीच भरणार आहेत ................आठवणीत तिच्या ....
क्षण न क्षण असेच धावत सुटणार आहेत .......
भेटी पहिल्या वहिल्या काही आठवतात अजून
ती समोर आल्यावर अगदी कसंसंच व्हायचं आतून
मी तिला विचारल्यावर काय साली लाजली होती ......
चेहऱ्यावर दाखवत नव्हती पण ,
आतून ती सुद्धा मोहरून गेली होती
असेच दिवस सरत होते ........
तिच्याविना झुरत होते ...........
विचारांची डोक्यात नुसती गर्दी झाली होती
आणि ती मात्र नेहमीप्रमाणे उशिराच आली होती ......


 

Friday, 6 May 2011

नको रे पुन्हा तीच शब्दांची माळ
एकास एक यमकांची चाळ
जरी सांडती विचार सर्वकाळ
नका रे म्हणू ह्या प्रतिभा वगैरे ......
"जरी सर्वदा काळ सन्नीध आहे
जीव रे तुला काय निषिद्ध आहे
आयुष्य आहे असा एक झोका
सदोदित आहे धोका वगैरे ......"

Thursday, 14 April 2011

 माझ्या मित्राने फेसबुक वरती टाकलेली कविता :
"कस असत नक्की प्रेम सांगा मला एकदा,
झालं का कुणाला कधी विचारलं मी अनेकदा,
वाटत कस, नेमक होत काय,
नयनबाण हृदयापार, का चुंबनगोळी "धांय धांय",
हत्ती एवढा confidence होतो, का शांत मनाची गोगलगाय,
सांगा कुणीतरी नेमक नक्की होत काय....."




 तिला मी दिलेलं उत्तर:

"कसं सांगू मित्रा तुला कसं असत प्रेम ??
भावना जरी सारखी असली तरी प्रत्येकाचं नसत सेम 

"झालं का कधी कुणाला " असं विचारण्यापेक्षा एकदा तूच प्रेम करून बघ 
प्रेम केलंस की कळेल तुला किती सुंदर आहे जग 


"नयनबाण की चुंबनगोळी" style वेगळी प्रत्येकाची 
बऱ्याचवेळा गुगली वरती विकेट पडते कित्येकांची


कसं सांगू  मित्रा तुला प्रेम म्हणजे नक्की काय 
नुकतंच पंख फुटलेलं पाखरू की गरम दुधावरची मउ तलम साय ..... "





Tuesday, 12 April 2011

कधी कळणार तुला 
       तू बोलली नाहीस की मला कसं वाटत
शब्दांविना तुझ्या 
      काळीज माझं तिळ तिळ तुटत       

Sunday, 10 April 2011

वाचतो मी , टोचतो मी , 
           बोचतो ही मला मी 
पाहतो मी , साहतो मी ,
           चाहतो ही मला मी ......
 श्वास मी , उच्छ्वास मी 
          विश्वास ही मला मी
आशा मी , निराशा मी
          अन आकांक्षा ही मला मी ......





















Thursday, 7 April 2011

प्रतिभेच्या सरितेला पूर आला थोडा,
अन कृष्ण-मेघासवे धावला वरुणाचा काळा घोडा 

कधी टप-टप कधी रिप-रिप कधी रिम-झिम
झाले मन माझे ओले चिम....................

देहास जाई  स्पर्शून जेव्हा  सोसाट्याचा वारा
आठवे स्पर्श प्रियेचा उठे सर्वांगी शहारा

शहारलेले अंग आणि मनी असे हूर हूर 
नकळत हरवून जाताना त्यात, मी जातो माझ्यापासून दूर 

का कळे ना याच वेळी एकांत हा मजला छळे
साथ सोबत ना कुणाची अन भास हा मज पुढे पळे

चिंब भिजतो मी म्हणूनी नेहमीच खातो ओरडा 
हासतेस तू इथे अन पाउस होतो कोरडा ....................

















Wednesday, 6 April 2011

"जाती धर्माचे राजकारण ठेवणार आम्ही सुरु
त्यासाठी आम्ही काय वाट्टेल ते करू
आमच्याच माणसांबाबत मनात विष सुद्धा भरू
आणि आता तर नवीन जावई शोध
दादोजी म्हणे नवतेच शिवरायांचे 'गुरु'                   1


'गुरु' 'गुरु'
म्हणजे नक्की कोण किंवा काय
याचे उत्तर आम्हाला देता येत नाय
आम्हाला एकच गोष्ट पक्की ठाउक हाय
की पुढे जाणाऱ्यांचे कसे खेचावे पाय                        2

चारशे वर्षांपूर्वी जेवा माजला होता अधर्म
शिवरायांनी स्थापन केला स्वकष्टाने स्वधर्म
या कार्यी आले तेव्हा योद्धे बरेच कामी
आणि दादोजी तर त्यातील सगळ्यात पहिली असामी  3

ज्या पुण्यात फिरले होते नांगर गाढवांचे
तिथेच त्यांनी फिरवले नांगर सोन्याचे
जगाच्या पाठीवर हि एकमेव घटना
पण त्यांचीच आज चालवल्ये आम्ही घोर विटंबना    4

आता जातीवादाला सुरुवात झालीच आहे
तर एकच सांगतो येथे
शिवरायांच्या काळात फितूर होते
अनेक सरदार "मराठे"  5

स्वधर्मियांच्याबद्दल मनात इतका जळजळीत द्वेष
परकीय आक्रमणाविरोधात दिसत नाही कधी असा त्वेष
आता हे लोक आम्हाला सांगणार दादोजींचे कार्य आणि त्यांची निष्ठा
आणि पुढे कितीतरी काळ जाईल साफ करण्यात,
यांनी टाकलेली हि विष्ठा                                  6
 
कोणी कितीही ओकली गरळ तरी
 नाही बदलणार इतिहास
पण आज इतक्या वर्षांनी तो बदलण्याचा
का चाललाय अट्टाहास?                                7

अशी कृत्ये करून आपण आपलीच माणसे दुखावतो
आणि अशा कृत्यांमुळे आपला स्वाभिमान मात्र सुखावतो
' जेम्स लेन ' ला ठणकावायला आम्ही आजही बिचकतो
पण, स्वधर्मियांबाबत मात्र लगेच दात विचकतो    8

राजकारण्यांना इथल्या फक्त हवी असतात मते
तुम्हाला काडीचीही किंमत नसते त्यांच्या मते
काहीही करून मिळवायचे असतात यांना मतांचे गठ्ठे
आणि त्यासाठी कित्येक महापुरुष दावणीला बांधतात हे पठ्ठे  9

इतिहासाची होत असते पुनरावृत्ती
अन त्यापायीच फोफावत चालल्ये आज ही विषप्रवृत्ती
वतनदारांनी त्या काळी वतनासाठी हत्यार उपसले
मतांच्या राजकारणात आज कित्येक महापुरुष नासले           10

आता या काव्याचा काय करावा शेवट असा प्रश्न मला पडलाय
कारण, कितीही बोंबललो तरी घसा आपलाच फुटणार याचा मला विसर पडलाय
नोकरी आणि छोकरी च्या बाहेर सुद्धा जग असत
हे आजचा युवक विसरत चाललाय .............................package आणि degree  च्या गोंधळात तो बिचारा पुरता बहिरा झालाय
याचाच फायदा घेऊन काही समाज कंटकांनी स्वधर्माचाच लिलाव मांडलाय
अन त्यात आमच्या शिवरायांचा श्वास मात्र पुरता कोंडलाय ................................." 11

विरं
गु
ळा


कविता करणं हा माझा फक्त विरंगुळा ................

कविता करणं हा माझा फक्त विरंगुळा .........

जसा गुळाच्या ढेपेला चिकटतो डोंगळा

रोज अंघोळ करून कावळ्याचा होत नाही कधी बगळा

Tuesday, 5 April 2011

एकास एक वाटे झकास
उरे शेवटी एकटाची भकास
सदा सर्वदा जो जगी वाटे खास
कळे शेवटी शेवटी एक भास 
कधी तू कधी मी
कधी कधी कुणीच नाही ....

कधी सांज कधी रात
कधी कुणाची साथ नाही ....


कधी आसू कधी हासू
कधी कधी दोन्हीही ....

कधी प्रेम कधी विरह
कधी डोळा पाणीही ......

कधी सूर कधी ताल
कधी कधी नुसतीच लय.........

कधी आठवण कधी ओढ
कधी अशीच दाटून येते सय .........

कधी गंध मातीचा, कधी तुझ्या प्रीतीचा
कधी झुरणाऱ्या रातीचा,कधी मनी दाटलेल्या भीतीचा

कधी प्रश्न ??  कधी उत्तर
कधी कधी होतो मी निरुत्तर

कधी रंग कधी संग
कधी कुठूनसे उडत येते तुझ्या आठवणींचे अत्तर

कधी रुसणे कधी हसणे
कधी कधी नुसताच बहाणा जीवघेणा

कधी नवे ते भुलला तुझ्यावर
या वेड्या जगातला एक शहाणा

"एका एकांत वेळी
ह्या अबोल संध्याकाळी
कवितेच्या स्फुरल्या ओळी
काव्याची भरली झोळी

एका अनोळखी या गावी
ऐकू यावी अवचित ओवी
आणि नकळत मग माझ्या ह्या
एकांता सोबत व्हावी

एकांती नेहमीच ऐसा
एकटाच असतो बसुनी
पल - पल वेळ दौडत असते
माझ्या एकांतावर हसुनी

बोलायाला नसते कोणी
कसे बसावे तरी मग रुसुनी
अपेक्ष्यांच्या गावा मध्ये
मन जाई अलगद फसुनी"