साधारण २ महिन्यापूर्वी ------- "आग.......... आग........" ,' अरे काय झालं??' "काही नाही रे जरा तालीम चालू आहे आपत्ती आलीच आज उद्या तर आपण रेडी पाहिजे ना पळायला"...... बरोबर रे बाबा !!!!! कधी काय होईल या राज्यात काही नेम नाही रे ....... आतापर्यंत पाहतोयस ना २६/७ ला पाण्याने बुडवलं ............ २६/११ ला अतिरेक्यांनी उडवलं .......... आणि मध्ये मध्ये काही किरकोळ गोष्टी चालूच असतात ..... म्हणजे ह्यांना अतिरेक्यांना पोसता येत पण राज्यातला दुष्काळ घालवता येत नाही ...... एक अतिरेकी मारला गेला म्हणे तुरुंगात तर पोलीस अधिकारी निलंबित होतो ..... पण जनतेला चांगलं वाटावं म्हणून अतिरेक्यांना फाशी देता येत नाही ............
२ महिन्यानंतर -------- " आग आग " अर्रे बाप रे खरंच आग लागली की राव आज मंत्रालयाला .... बर झालं साहेबांनी आधीच सराव करूब घेतला होता म्हणून नाहीतर आज काही खंर नव्हत ..... साहेबांना मानायला हव काय "दूरदृष्टी" आहे!!!! खरंच असे साहेब आहेत म्हणूनच राज्य चाललंय आज नाहीतर काय माहित काय झालं असत ....... आता मस्त पैकी सुट्टी एन्जॉय करूया बरेच दिवस मनात होत एखादी परदेशवारी करून यावी आयती संधीच मिळाली आता ...... मंत्रालय दुरुस्तीचं टेंडर काढू मस्त आणि मारून येऊ एक ट्रीप ......
अजून किती दिवस असे नालायक राज्यकर्ते आपण निवडून देणार आहोत ..... जो मुख्यमंत्री स्वतःच ऑफिस नाही वाचवू शकलेला तो राज्याची जबाबदारी काय सांभाळणार ???? पण आपण चार दिवस हा विषय चावणार अगदी चवीने आणि नंतर विसरून जाणार ...... परत हेच लोक आपलं रक्त पिणार अर्रे प्लीज हे आता तरी थांबवा ..........
No comments:
Post a Comment